शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे ७ व ८ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी दौऱ्यावर येत असून, यावेळी कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत.
कोकण पदवीधर मतदारसंघ व पक्षवाढीच्या दृष्टीने आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याकडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष लागले असून, पदाधिकाऱ्यांकडून या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.
शिवसेनेच्या फुटीनंतर युवानेते आदित्य ठाकरे यांचा रत्नागिरीतील हा दुसरा दौरा आहे. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसह वाढीसाठी व पक्ष कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
सिंधुदुर्गमधून ते रत्नागिरीत येणार आहेत. ७ नोव्हेंबर रोजी राजापूरमधून जिल्हा दौऱ्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. राजापूर, लांजा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
रत्नागिरीमध्ये दि. ७ रोजी त्यांचे वास्तव्य असणार असून याठिकाणी शिवसैनिकांची एक सभाही घेणार आहेत. ८ रोजी ते संगमेश्वर, चिपळूण, खेडमार्गे रायगडमध्ये जाणार आहेत. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी ते पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
तसेच पक्षवाढीसाठी ते शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार व शिवसेना सचिव विनायक राऊतही त्यांच्यासोबत असणार आहेत. राजापूरच्या सिमेवर आमदार राजन साळवी त्यांचे जोरदार स्वागत करणार आहेत.
आमदार भास्कर जाधव, माजी आमदार संजय कदम, माजी आमदार सुभाष बने, माजी जि.प. अध्यक्ष रोहन बने यांच्यासह प्रमुख पदाधिकारी या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांच्यासोबत सहभागी होणार आहेत. रत्नागिरी दौऱ्यात आदित्य ठाकरे हे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात व कुणावर निशाना साधतात याकडेही लक्ष लागून राहिले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















