रत्नागिरी : नोटीस पाठवल्याच्या रागातून बँक कर्मचाऱ्याला मारहाण

banner 468x60

नोटीस पाठवल्याच्या रागातून बँक कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण करत त्याच्या कायदेशीर कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शुक्रवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६.४५ वा. कालावधीत युको बँक आणि नवलाई मंदिर नाचणे येथे घडली.अनंत गजानन शिंदे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

banner 728x90 banner 728x90

त्याच्याविरोधात रवीकिरण बाळासाहेब टेळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, अनंत शिंदे हा बँकेचा सहकर्जदार आहे. शुक्रवारी दुपारी रवीकिरण टेळे हे युको बँकेत काम करत असताना संशयित तिथे गेला.

त्याने रवीकिरण टेळे यांना तुम्ही मला नोटीस का दिली? असे विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर सायंकाळी टेळे बँकेतून घरी जात असताना संशयिताने त्यांच्या गाडीसमोर आपली गाडी आडवी लावून त्यांच्या कानाखाली मारली.

त्यानंतर टेळे यांना पुन्हा शिवीगाळ करत पुन्हा माझ्या वाटेत याल, तर लक्षात ठेवा, अशी धमकी देत त्यांच्या बँकेच्या कायदेशीर कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी संशयिताविरोधात शहर पोलिस अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *