बशीरभाई हजवानी यांच्या संकल्पनेतून त्यांच्या ट्रस्टकडून संपूर्ण महाराष्ट्रात 25 पेक्षा जास्त रुग्णवाहिका उपलब्ध करुन देणारे तसेच जनहिताचे विविध सामाजिक उपक्रम राबवून
कोकणात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे कोकणातील उदयोजक बशीरभाई हजवानी यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी तालुक्याच्या सेवेसाठी बशीर एम. हजवानी ट्रस्टतर्फे सर्वसामान्य माणसांना परवडेल अशा सवलतीच्या दरात रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा अशी धारणा असणारे बशीरभाई हे जिल्हयातील एक आदर्श व्यक्तीमत्व आहे.
बशीर हजवानी हे मूळचे खेड तालुक्यातील असून जनहिताच्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे त्यांची ओळख व्यक्तीमत्व, सामाजिक कार्यकर्ता, अनेक गरजूंना त्यांच्या गरजेनुसार विविध क्षेत्रात मदत उपलब्ध करुन देण्यात त्यांचा नावलौकीक असल्याने कोकणातील नामांकित मसीहा म्हणून ते ओळखले जातात.
बशीर हजवानी ट्रस्टकडून विविध शाळा, महाविदयालये, हॉस्पीटल विविध गरजूंना मदत करणे अशा विविध सोईसुविधा उपलब्ध करुन सर्वसामान्य माणसाला तत्पर सेवा उपलब्ध करुन देणारा अवलिया म्हणूनही ओळखले जातात.
रत्नागिरी तालुक्यासाठी त्यांनी कार्डियक रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली असून ही रुग्णवाहिका अे.सी. , नॉन ए.सी. व आय.सी. यू. सुविधासहित उपलब्ध आहे.
या रुग्णवाहिकेची जबाबदारी फैयाज मुकादम शिवसेना विभागसंघटक मिरजोळे जि.प. गट तसेच सरपंच मजगाव ता.रत्नागिरी व त्यांच्या सहकार्यांकडे दिली आहे. ट्रस्टकडून उपलब्ध करुन दिलेली ही रुग्णवाहिका सवलतीच्या दरात रत्नागिरीकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.
रुग्णवाहिका रत्नागिरीकरांच्या सेवेत दिनांक 22 ऑक्टोबर 2023 पासून उपलब्ध होणार आहे. ज्यांना रुग्णवाहिकेची आवश्यकता असेल त्यांनी सदर रुग्णवाहिकेचा वाहनचालक शम्मी मोबा.नं. 9423249212 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन फैयाज मुकादम व त्यांच्या रत्नागिरी येथील सहकार्यांनी केले आहे. या रुग्णवाहिकेचे उदघाटन काही कारणास्तव पुढील महिन्यात करण्यात येणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*