रत्नागिरी : किरकोळ कारणातून एसटी वाहकाला मारहाण

banner 468x60

अरुंद रस्त्यावर गाडी मागे घे, असे सांगितल्याच्या रागातून एसटी वाहकाच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून त्याला शिवीगाळ करणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90 banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

ही घटना शनिवारी सायंकाळी ४.५० वा. केळे गावातील वाघधरे स्टॉपकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. जैद जुवेद मजगावकर (रा. केळे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

त्याच्या विरोधात एसटी वाहक मनोज पिंगळे (३५, रा. वाशिम) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी सायंकाळी (एमएच १४ बीटी ४४६२) या म्हामूरवाडी ते रत्नागिरी जाणाऱ्या एसटीतून फिर्यादी हे वाहक म्हणून जात होते.

एसटी केळे गावातील वाघधरे स्टॉपजवळ आली असता तेथील वळणावर समोरुन जैद मजगावकर आपल्या ताब्यातील कार (एमएच०८एएन७३५३) घेऊन येत होता. तेथील रस्ता अरुंद असल्याने वाहक मनोज पिंगळे यांनी जैदला गाडी मागे घे असे सांगितले.

याचा राग आल्याने त्याने पिंगळे यांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करत शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. त्यानंतर एसटीमध्ये येउन त्यांच्या सरकारी गणवेशाचे शर्ट ओढून त्याची दोन बटणे तोडून ते शुटिंग करत असलेला मोबाईल आणि त्यांच्याकडील तिकिटाचे पैसे ओढून घेऊन ते गाडीतच फेकून देऊन नुकसान केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *