शहरानजीच्या फणसोप सडा येथे अल्पवयीन मुलाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वा. सुमारास उघडकीस आली.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
सर्वेश विश्वनाथ माळी (१७, रा. सध्या रा. फणसोपसडा, रत्नागिरी, मूळ रा. देऊळवाडी-हर्चे, ता. लांजा) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.
सर्वेश हा मानसिक रुग्ण होता. फणसोपसडा येथे मामाच्या घरी असताना त्याने नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब त्याच्या नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सर्वेशला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.
वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सर्वेशचे वडील विश्वनाथ सखाराम माळी (४०, रा. देऊळवाडी- हर्चे, ता. लांजा) यांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यावरून शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















