Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

संगमेश्वर : रंगकाम ठेकेदाराची मुलगी झाली एमबीबीएस

banner 468x60

संगमेश्वर तालुक्यातील कानरकोंड येथील रंगकाम ठेकेदाराची मुलगी एमबीबीएस झाली असून, तिने आपले शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण केल्यानंतर ती पुढील शिक्षण मुंबईला जाऊन पूर्ण केले.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90 banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

अस्मिता आत्माराम कानर हिचे लहानपणापासून डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा आंबेडबुद्रुक कानरकोंड या ठिकाणी घेतल्यानंतर वडील मुंबईला असल्याने तिने पुढील शिक्षणासाठी मुंबई गाठली.

मुंबई येथे बारावी सायन्स केल्यानंतर नीट परीक्षा दिली; परंतु भारतामध्ये एमबीबीएससाठी प्रवेश मिळाला नाही. अस्मिताने या ठिकाणी न खचता एमबीबीएस शिक्षण घेण्यासाठी रशियात जाण्याचा निर्णय घेतला.

तिने एमबीबीएस या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे. कानरकोंड गावातील तसेच पंचक्रोशीतील दुर्गम गावातील ही पहिलीच विद्यार्थिनी आहे. तिचे वडील हे सर्वसामान्य घरातील असून, ते रंगकाम ठेकेदार आहेत. कठीण परिस्थितीमध्ये तिने आपले शिक्षण पूर्ण केले आहे.

तिच्या यशाबद्दल अस्मिता म्हणाली, मुलींनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये न खचता परिपूर्ण अभ्यास आणि चिकाटीने आपले यश संपादन करता येते. यापुढेही आपण शिक्षण चालू ठेवणार असल्याचे तिने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *