दापोली समुद्र किनाऱ्यावर मिळणाऱ्या बेवारस चरसच्या बॅगांनंतर रत्नागिरी (Ratnagiri) तालुक्यातील वारे समुद्र (Ware Sea) किनारी अमली पदार्थसदृश पांढरे गोळे मोठ्या प्रमाणात लागले आहेत.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
सुमारे २०० किलो गोळे किनाऱ्यावर लागल्याने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.किनाऱ्यावरील प्रवेश पोलिसांनी बंद केला आहे. हे गोळे नेमके कशाचे आहेत, याची शहानिशा केली करण्यासाठी ते फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार आहेत.
जिल्ह्यातील दापोली समुद्र किनारी १४ ऑगस्टपासून आजपर्यंत मोठ्या प्रमाणात चरस या अमली पदार्थांच्या बॅगा मिळत आहेत. याबेवारस बॅगांबाबत पोलिस तपास करीत आहेत. तसेच कस्टम विभागालाही मोठ्या संख्येने या बॅगा मिळाल्या आहेत. आतापर्यंत १० कोटींवर चरस पोलिस आणि कस्टम विभागान जप्त केला आहे.
गुजरात एटीएसची संपर्क साधला असता तेथेही अशा प्रकारच्या बॅगा सापडल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गुजरात कनेक्शन आहे का, याचा तपास सुरू आहे.
या घटनेनंतर जिल्हा पोलिसांनी जिल्ह्यातील संपुर्ण किनारपट्टी भागात स्थानिक ग्रामस्थ, पोलिस पाटील यांची मदत घेतली. किनारपट्टी पिंजत असताना आज सकाळी आठ वाजण्याच्या सूमारास आरे-वारे येथील वारे समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थसदृश्य पांढरे गोळे लागल्याची खबर ग्रामीण पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन वारे किनाऱ्यावरील प्रवेश सर्वांसाठी बंद करण्यात आला. सायंकाळी उशिरापर्यंत सुमारे दोनशे किलोच्या वर हे गोळे सापडले आहे.
सापडलेले पांढरे गोळे हे कोणतीही स्फोटके किंवा अन्य संशयास्पद वस्तू नाही, असा निर्वाळा पोलिस यंत्रणेने दिला आहे. हे गोळे नेमके कशाचे आहेत, याची खात्री करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबला तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*













