रत्नागिरी : Petrol Diesel Tanker Drivers Strike: भटकंतीस आलेल्या पर्यटकांची पेट्रोल- डिझेलसाठी कोकणात भ्रमंती

banner 468x60

नव्या हिट अँड रन कायद्याच्या (New Hit And Run Law) विरोधात आजही (मंगळवार) राज्यभरात ट्रक चालकांचा संप (truck driver strike) सुरु आहे.

यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा निर्माण होईल अशी भीती व्यक्त केली गेली. कोकणात देखील पर्यटक इंधनासाठी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लावून होते.

(Maharashtra News) टँकर चालकांच्या संपामुळे रत्नागिरीत डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंपावर वाहन चालकांची गर्दी असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

यामुळे वाहनांच्या लांबच लाब रांगा पेट्रोल पंपावर होत्या. बहुतांश ठिकाणी वाहनचालक हे रांगेत उभे राहून दुचाकी आणि चार चाकीत पेट्रोल आणि डिझेल भरताना दिसत होते. या संपाचा सर्वाधिक फटका हा कोकणात आलेल्या पर्यटकांना बसला.

तासमतास रांगेत उभे राहून त्यांना पेट्रोल आणि डिझेल भरावे लागले. पुण्याहून गोव्याला गेलेल्या पर्यटकांनी कोकणातील त्यांचे पुढचे प्लॅन रद्द केल्याची माहिती दिली. पर्यटक म्हणाले इंधन भरण्यातच जादा वेळ गेला आहे. त्यामुळे पुढचा सगळा प्लॅन ठप्प झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *