राजापूर तालुक्यातील जुवे जैतापूर ग्रामपंचायतीची निवडणूक तब्बल बाराव्या वेळीही बिनविरोध झाली.
ग्रामपंचायतीच्या इतिहासात एकदाही मतदान प्रक्रिया पार पडली नाही. यावेळीही बिनविरोधची परंपरा कायम राखली असली तरी अद्यापही या गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याचे भयान वास्तव आहे.
जुवे जैतापूर गाव हे जैतापूरला जवळ असून चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. यामुळे भौगलिक क्षेत्रही मर्यादीत आहे. ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये ८२ मतदारांनी आपली नावे नोंदविली आहेत.
रत्नागिरी जिल्हातील सर्वाधिक कमी मतदार असलेली ही ग्रामपंचायत आहे. ७ सदस्य संख्या व लोकनियुक्त सरपंच अशी ८ सदस्यांची ग्रामपंचायत आहे. यंदाही जुवे जैतापूर ग्रामपंचायतीने आपली बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम राखली असुन आता या ग्रामपंचायतीवर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाने आपला दावा केला आहे.
शिवसेनेचे वर्चस्व गेली ५४ वर्ष या ग्रामपंचायतीवर कायम शिवसेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. मात्र अद्यापही या गावाच्या महत्वाच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. अनेक समस्येमुळे ही ग्रामपंचायत समस्यांचे आगर बनली आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















