कोकण : निलेश राणेंच्या एक्झिटने किरण सामंतांचा मार्ग मोकळा झाला का ?

banner 468x60

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपा यांनी राज्यात मिशन ४५ हाती घेतले आहे. त्यात निवडून येणाऱ्या उमेदवारालाच तिकीट देण्याचा महायुतीचा इरादा आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

त्यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग इथं सध्या विनायक राऊत खासदार आहेत. ते ठाकरे गटात आहेत. त्यामुळे या लोकसभा मतदारसंघात विजयी होण्यासाठी शिंदेची शिवसेना-भाजपा प्रयत्नशील आहेत.

त्यात उदय सामंत यांच्या बंधूचे नाव सातत्याने चर्चेत आहे. अशावेळी निलेश राणेंनी अचानक राजकारणातून एक्झिट घेतल्याने किरण सामंत यांचा मार्ग मोकळा झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

कोण आहे किरण सामंत?

किरण सामंत हे मंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आहेत. उद्योजक किरण सामंत अनेक वर्षे राजकारणात कार्यरत आहेत. मात्र ते नेहमी पडद्यामागे होते.

राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून ते पडद्यासमोर येऊन कार्यरत झाले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवार म्हणून किरण सामंत यांचे नाव चर्चेत आहे. सरकारने किरण सामंत यांची सिंधुरत्न योजनेच्या सदस्यपदी नेमणूक केली.

रत्नागिरी मतदारसंघात उदय सामंत चार वेळा निवडून आलेत त्यामागे किरण सामंत यांचाही मोठा वाटा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या राजकारणात ते सक्रीय आहेत. किरण सामंत यांनी आजपर्यंत त्यांनी कुठलेही राजकीय पद घेतले नव्हते ते राजकारणात फ्रंटला नसले तरी पडद्यामागून सूत्रे त्यांच्या हातात असतात.

मतदारसंघात दांडगा जनसंपर्क, कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी, अडलेल्या लोकांची कामे करणे यातून ते सतत कार्यरत असतात. रत्नागिरी-सिंधुदुर्ग इथं त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या एका ट्विटनं भाजपाला धक्का बसला आहे. निलेश राणे यांनी सक्रीय राजकारणातून कायमचे बाजूला जात असल्याचे घोषित केले. निलेश राणेंनी हा पवित्रा का आणि कशासाठी घेतला हे अद्याप स्पष्ट नसले तरी रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या राजकारणात याची चर्चा होताना दिसतेय.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्या वादाचे पडसाद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्यात दिसले. उपमुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरी दौऱ्यावर गेले असताना याठिकाणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. दौऱ्यात भाजपा पदाधिकारी नसल्याने देवेंद्र फडणवीसांनी बावनकुळे आणि चव्हाण यांनाही फोन करून घडलेला प्रकार कानावर घातला.

नुकतेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना त्यांनी, ज्याच्या नशिबात असेल त्यालाच तिकीट मिळेल असं विधान केलं आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघातून निलेश राणे कालपर्यंत सक्रीय होते. परंतु, अचानक दसऱ्याला त्यांनी राजकारणातून एक्झिट घेत असल्याची घोषणा केली.

यामागे भाजपातील अंतर्गत कुरघोडी हे कारण आहे की हे सगळं दबावतंत्राचे राजकारण हे येत्या काही काळात स्पष्ट होईल. वैभव नाईक हे ठाकरे गटाचे आमदार असले तरी त्यांचे मुख्यमंत्री शिंदे आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी राजकारणापलीकडे संबंध आहेत.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कार्यशैलीबद्दल राणे नाराज आहे. पक्षातील राणे समर्थकांना डावललं जाणे आणि विरोधी पक्षातील आमदारांना बळ देणे यामुळे पालकमंत्री चव्हाण आणि राणे यांच्यात वितुष्ट आल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात. आमदार वैभव नाईक यांनीही या नाराजीवर भाष्य करताना, ‘राणेंनी अद्याप रवींद्र चव्हाणांना पालकमंत्री म्हणून स्वीकारलं नाही, रवींद्र चव्हाणांनी मंजूर केलेली कामे

रखडवण्यासाठी राणे पडद्यामागून भूमिका बजावतात, राणेंचा त्यांच्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांवर विश्वास नाही’, अशी सूचक आणि खोचक टिप्पणी केली होती. त्याचसोबत गणेशोत्सव काळात राणेंचे कडवे विरोधक संदेश पारकर यांनीही चव्हाणांची भेट घेतली होती.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *