दापोली : रामराजे महाविद्यालयात रानभाज्या महोत्सव संपन्न

रामराजे महाविद्यालयात रानभाज्या महोत्सव संपन्न

banner 468x60

आरोग्याच्या दृष्टीकोनातून रानभाज्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याच्या वापराने आयुर्वेदिकदृष्ट्या चांगले परिणाम होणार आहेत. निसर्ग आपल्याला खूप काही देतो.

सध्याच्या युगामध्ये निरोगी आयुष्य जगणं हे प्रत्येकासाठी आव्हानात्मक आहे, पण नैसर्गिकरित्या उगवल्या जाणाऱ्या रानभाज्या या खऱ्या अर्थाने आरोग्याचा जागर आहे.

याच पार्श्वभूमीवर दापोलीतील रामराजे महाविद्यालयामधील हॉटेल मॅनेजमेंट विभागाने आयोजित केलेल्या रानभाज्यांच्या रानमाया या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या महोत्सवामध्ये तब्बल 36 प्रकारच्या रानभाज्या पासून 42 प्रकारचे पदार्थ बनवण्यात आले होते विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ हॉटेल मॅनेजमेंट विभागातील विद्यार्थ्यांनी बनवलेले होते. यामध्ये भारंगी, टाकळा, कुर्डू, करटोली, मायाळू, चिचार्डी, पेव, दिंडा, लाजाळू, तेरी, अळू, बांबू, शेवगा, ओव्याची पाने, भुई आवळा, सुरण, रेशीम काटा, थरबरा, चुच, कानकिर्डा इत्यादी प्रकारच्या भाज्यांचा समावेश होता.

या महोत्सवाचे उद्घाटन कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते झालं. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव संदीप राजपुरे, अध्यक्षा स्मिताली राजपुरे, रामराजे महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ.दीपक हर्डीकर, प्राचार्य डॉ. अशोक निर्बाण, नगरसेविका साधनाताई बोत्रे, डॉ.प्रवीण झगडे, विश्वास कदम, संस्थेचे संचालक चेतन जैन, महेश जैन,योगेश जैन,धर्मेंद्र जैन, माहेश्वरी महिला संघाच्या जिल्हाध्यक्षा कविता मालू तसेच पत्रकार, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

रामराजे महाविद्यालयाचे सातत्य व नाविन्यपूर्ण असणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक देखील करण्यात येत आहे. आयुर्वेदिक आणि औषधी रानभाज्या यांचा मेळ घालून अधिक रानभाज्या जनतेपर्यंत कशा पोहोचवता येऊ शकेल याबाबत मार्गदर्शन देखील करण्यात आलं

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *