Breaking News
महाड : तडकाफडकी बदलीमुळे महाडचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांचा आत्महत्येचा इशारा; वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचा वरिष्ठांवर गंभीर आरोप, मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले यांना मदत करण्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणल्याचा आरोप दापोली : दशानेमा गुजर युवक संघटना, दापोली आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा–2026 उत्साहात संपन्न 89 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; गुणवंतांचा गौरव BIG NEWS मोठी बातमी – गावच्या सरपंचांना मोठी लॉटरी ! मुदत संपली तरी खुर्ची सुरक्षित, राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, विद्यमान सरपंच प्रशासक म्हणून काम पाहणार, काय आहे प्रकरण सर्व पाहा चिपळूण : बस आणि कारचा अपघात, कार चालकावर गुन्हा राजापूर : नारळाच्या झाडावरून पडून वृद्धाचा मृत्यू

शृंगारतली : MKCL आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी मार्फत संपन्न

banner 468x60

शृंगारतली ,प्रतिनिधी

banner 728x90 banner 728x90

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त MKCL आयोजित प्रश्नमंजुषा स्पर्धा परीक्षा युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी चे संचालक जहूर बोट यांच्या सहकार्याने अनेक शाळा व कॉलेजमध्ये इ.५ वी ते १२ वी तील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909


ह्या परीक्षेचा कार्यक्रम MKCL आणि युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर, शृंगारतळी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच उत्साहात संपन्न झाला. हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला. ही परीक्षा काही क्रांतिकारी ,सत्याग्रह ,स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरणादायी महापुरुष यांच्या जीवनाचा अभ्यास करून त्यावर आधारित प्रश्नांवर घेण्यात आली.

उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर तर्फे प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन स्वातंत्र्यदिनी त्या त्या शाळांमधील मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या परीक्षेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व शाळा , कॉलेजचे मुख्यध्यापक, प्राचार्य व त्यांचे सहभागी विद्यार्थी तसेच उत्तीर्ण झालेलया

सर्व विद्यार्थ्यांचे फ्लाईट एज्युकेशनल अ‍ॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष मा. शब्बीर बोट, युनिटेक कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक जहूर बोट, पर्यवेक्षिका पल्लवी शेट्ये , शिक्षिका सायली जाधव, सहायक शिक्षिका शिफा मालदोलकर, सोनल मोहिते इ. सर्वांनी अभिनंदन करून
पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *