रत्नागिरी : अरबी समुद्रात सापडला अनोळखी मृतदेह

banner 468x60

तालुक्यातील निवळी-कोकजेवठार येथे अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बुधवारी (ता. ८) रात्री पावणेनऊच्या सुमारास नदीच्या पात्राशेजारील कड्याचा आड येथे हा मृतदेह सापडला. या अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे ४५ ते ५० वर्षाचे आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,

कोकजेवठार गावातून वाहणाऱ्या नदीवरील निवळी धबधब्याच्या खालील बाजूस अनोळखी पुरुषाचा मृतदेह असल्याचे पोलिस पाटील शितप यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली. खबर मिळताच ग्रामीण पोलिस घटनास्थळी गेले होते. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात आणला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *