मंडणगड : सीएनजी लाईनवरून वादा, 4 जणांविरोधात गुन्हा

banner 468x60

मंडणगड एचपी सीएनजी पेट्रोल पंप येथे सीएनजी भरण्यासाठी लावण्यात आलेल्या लाईनवरून वाद होवून यामध्ये गंभीर दुखापत केल्याप्रकरणी चार जणांविरोधात मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

ही घटना २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलीस ठाण्यातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हसमुख धोंडू रटाटे ( वय ५१) राहणार पाट रोड मंडणगड यांनी याबाबत फिर्याद दिली असून भरत नामदेव कदम, हृतिक लक्ष्मण कदम, सुजल संजय पार्टे, रोहित लक्ष्मण कदम सर्व राहणार धुत्रोली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिनांक २० सप्टेंबर २०२३ रोजी हसमुख यांचा भाऊ विश्वास रटाटे हे सीएनजी भरण्यासाठी गेलेले असताना सीएनजी लाईन मधील नंबरवरून त्यांच्यासोबत या चार जणांनी वाद घालून शिवीगाळ केली.

या वादात फिर्यादी हसमुख रटाटे, विश्वास रटाटे व मुलगा हरीश रटाटे ठोश्या बुक्क्यांनी मारहाण करून हसमुख यांचा एक दात पाडला व तीन दात हलवून गंभीर दुखापत केल्याने चार जणांविरोधात

भादवी कलम ३२५, ३२३, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करीत असून यासंदर्भात कारवाई सुरू करण्यात आली आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *