खेड : कंपनीच्या कामाचा बहाणा करून तरुणीवर वारंवार अत्याचार, प्रवीण डोंगरे या अभियंत्याला अटक

banner 468x60

खेडमध्ये कंपनीच्या कामाचा बहाणा करून तरुणीला दिल्ली, माथेरान लोणावळा अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिचे शोषण करून तिला ठार मारण्याची धमकी देणाऱ्या एका अभियंत्याला पोलिसांनी मंगळवारी अटक केली.

प्रवीण सुधाकर डोंगरे (वय ५६, रा. यशवंत रेसीडेन्सी १०३. फ्रेंड कॉलनी भांडूप ईस्ट मुंबई) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. ही घटना १ नोव्हेंबर २०१९ ते २०२१ पर्यंत घडली होती.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीला संशयित प्रवीण डोंगरे कामाचे बहाण्याने तरुणीस भरणे येथील रिसॉर्ट येथे घेऊन गेले. तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले व त्यानंतर २०१९ ते २०२१ या कालावधीत हिच्याशी संशयिताने वारंवार शारीरिक संबंध ठेवले.

त्यानंतर १५ ऑगस्ट २०२३ संशयित प्रवीण डोंगरे यानी पीडित तरुणीला पोलिस ठाण्यात तक्रार केल्यास कुटुंबीयांना ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दमदाटी केल्याबाबत हसनबाद पोलिस ठाणे येथे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, शुन्य नंबरने गुन्हा खेड पोलिस ठाण्यात ४ ऑक्टोबर २०२३ दाखल झाला.

पोलिसांनी संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास खेड पोलिस अंमलदार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *