खेड : हॉटेलात चढ्यादराने देशीदारूची विक्री

banner 468x60

महामार्गावरील खवटी मंडलिककोंड येथील हॉटेल अनुसयात अवैद्य देशीदारूची विक्री चढ्यादराने केल्याने दोघांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

banner 728x90

ही घटना मंगळवारी सायंकाळी ७:२५ च्या सुमारास घडली.
पोलीस कंट्रोल रुमकडुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील व मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खवटी मंडलीककोंड येथील हॉटेल अनुसया आहे.

या ठिकाणी अवैद्यपणे देशीदारूची विक्री चढ्यादराने केली जात होती. याची गोपनीय माहीती खेड पोलीसांना मिळताच पोलिसांनी अचानक हॉटेलवर धाड टाकली.

तेथे 180 मिली देशी दारुची जीएम संत्रा प्रकारच्या 37 बाटल्या व दोनशे रुपये किंमतीचा स्टीलचा चौकोनी डबा, असा एकुण २ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हॉटेल चालक हरजोतसिंग नंदा (वय 29) आणि परमजितसिंग मुक्तारसिंग चंद्री (वय 42 ) दोन्ही रा. खवटी, मंडलिक कोंड या संशयीतांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. 323/2023 मध्ये महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *