शृंगारतळी : जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचा शुभारंभ

banner 468x60

कोकणात पाण्याची समस्या गंभीर असताना जलजीवन मिशन अंतर्गत नळपाणी योजनेचा भूमिपूजन सोहळा बुधवारी होणार आहे. सकाळी 10 वाजता शृंगारतळी येथील पालपेने फाटा, शृंगारतळी नळपाणी योजनेच्या सार्वजनिक विहिरीजवळ आमदार भास्कर जाधव महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री तथा पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909


सोबतच भूमिपूजन कार्यक्रमानंतर ग्रामपंचायत कार्यालय पाटपन्हाळे येथे आमदार भास्कर जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत मतदार संघाचा आढावा घेण्यात येणार आहे.

ही बैठक संपल्यानंतर मौजे कोंडवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत कोंडवाडी नळपाणी योजनेचा भूमिपूजन सोहळाआमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यासाठी मतदार संघातील ग्रामस्थ बंधू भगिनींनी सदर कार्यक्रमाला हजर राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *