जिल्ह्यात सध्या गांजा विक्रीचे प्रमाण वाढले आहे. चिपळूणमध्ये आठवडाभरात 8 जणांना अटक झाली आहे. खेडमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करून संबंधितांना अटक झाली आहे.
आता गुहागर तालुक्यातील आरे येथेही गांजा सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका प्रौढाला अटक केली असून, त्याकडून ४२ हजार रुपये किमतीचा १ किलो ३९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
चिपळूणमध्ये अनेक महाविद्यालयीन मुले गांजाच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे तेथे नागरिकांनीही गांजा विक्रीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
आतापर्यंत अनेक लोकांना अटक झाली असली, तरी सूत्रधार अजूनही लांबच आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या इतर भागांत गांजा विक्री सुरू आहे.चिपळूणमध्ये कारवाई कडक होत असताना आता गुहागर तालुक्यातील आरे भंडारवाडा येथेही गांजा पकडण्यात आला आहे.
शैलेश चंद्रकांत भोसले (४५, आरे, गुहागर) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे ४२,१२० रुपये किमतीचा १,३९० ग्रॅम वजनाचा गांजा सापडला आहे. गुहागर पोलिसांनी पुढील तपासालाही वेगाने सुरुवात केली आहे. त्याला कोणाकडून गांजा मिळत होता, याचा तपास केला जात आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















