गुहागर : एसटी कर्मचाऱ्यांना अन्नदान

banner 468x60

लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे अध्यक्ष संतोष वरंडे व सचिव सचिन मुसळे यांच्या माध्यमातून खजिनदार मनिष खरे व माधव ओक यांच्या विशेष सहकार्यातून एसटी बस कर्मचाऱ्यांना भंडारी भवन हॉल येथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

banner 728x90

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

चाकरमान्यांना घेऊन येणाऱ्या एसटी चालक व वाहक कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था शहरातील भंडारी भवन येथे करण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात शहरातील बहुतांशी हॉटेल व घरगुती खानावळी बंद असतात.

अशावेळी आलेल्या कर्मचाऱ्यांना जेवणासाठी वणवण भटकावे लागते. ही दखल घेत लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीतर्फे २७५ कर्मचाऱ्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली. तसेच पाणीबॉटल देण्यात आल्या.

या वेळी एसटी महामंडळ गुहागरचे विवेक गानू, संदीप वैद्य, जीवनश्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी विनायक जाधव, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे माजी अध्यक्ष शामकांत खातू, निखिल तांबट उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *