दापोली:हवेच्या गुणवत्तेचा स्तर लोटे पेक्षा घसरला

banner 468x60

दापोली : दिल्ली व मुंबई प्रमाणे मिनी महाबळेश्वर म्हणून बिरूद मिरवणाऱ्या दापोलीला देखील हवेच्या प्रदूषणाने ग्रासलेले दिसून येत आहे.

सोमवारी दापोलीच्या हवेच्या गुणवत्तेचा स्तर १२१ वर गेला होता. यामुळे निसर्गप्रेमी, पर्यावरणप्रेमी चिंता व्यक्त करत आहेत.

कोकणातील दापोली हे मिनी महाबळेश्वर म्हणून परिचित आहे. येथे देशभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. दापोलीमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचा धूर ओकणारा कारखाना नाही. तरी देखील दापोलीच्या हवेच्या गुणवत्तेत यंदा चांगलीच घसरण झाल्याचे दिसून येत आहे.

गुगलवर दापोलीच्या हवेची गुणवत्ता तपासली असता ती १२१ एक्युआय म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स आढळून आली. त्याचवेळी खेड लोटे एमआयडीसी येथील गुणवत्ता १०१ एवढी आढळून आली.यामुळे लोटे येथील प्रदूषणापेक्षा दापोलीचे प्रदूषण अधिक असल्याचे जाणवले. याबाबत निसर्गप्रेमींशी चर्चा केली असता दापोली शहरातील खराब रस्ते, यावरून जाणाऱ्या गाड्या व त्यांची उडणारी धूळ यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *