दापोली : मोटार झाडावर आदळून तिघे जखमी

banner 468x60

दापोली-हर्णे मार्गावरील गिम्हवणे शाळेसमोर कुत्रा आडवा आल्याने मोटार सायकलचा अपघात झाला आहे. मोटार रस्त्याशेजारील झाडावर आदळली आहे.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

विटा (खानापूर) येथील मंजुनाथ सिधाप्पा चव्हाण हे त्यांच्या मित्रांसह मोटार घेऊन हर्णे येथे फिरायला आले होते. हर्णे येथून गावी परत जात असताना दुपारी त्यांची मोटार गिम्हवणे शाळेजवळ आली असता अचानक त्यांच्या गाडीसमोर कुत्रा आला.

चालक दीपक दत्तात्रय वायदंडे (वय ३०) यांचा गाडीवरील ताबा सुटला व गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. अपघातात चालक दीपक वायदंडे, प्रमोद रणदिवे, सादू साठे जखमी झाले. चालक दीपक वायदंडे याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *