जेजुरी पुरंदर परिसरातून फिरण्यासाठी आलेल्या एका ४० वर्षीय युवक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन दिवसांपूर्वी दहा जणांचा एक ग्रुप दापोली तालुक्यात पर्यटनासाठी आला होता.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
रमेश अंजाबा गाढवे (वय ४० रा. जेजुरी ता. पुरंदर जिल्हा पुणे) असं मृत्यू झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. ०७ ऑक्टोबर २०२३ रोजी १२.३० वाजताच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. मृत्यू झालेले रमेश अंजाबा गाढवे (वय ४० रा. जेजुरी ता. पुरंदर) त्यांचे मित्र हे लाडघर बिचवर समुद्र स्नानासाठी आले होते.
यावेळी रमेश अंजाबा गाढवे यांनी मित्राच्या खांद्यावरुन समुद्राच्या पाण्यामध्ये सुर मारल्याने त्यांच्या मानेला दुखापत झाली.
त्यानंतर त्यांना त्यांच्या मित्रांनी तात्काळ दापोली जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*