दाभोळ (प्रतिनिधी)
तालुक्यातील दाभोळ एसटी स्टँड आता एस चकाचक होणार असून यासाठी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पारदळे यांनी आमदार योगेश कदम यांना निवेदन दिले होते.
🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या
पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy
👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर संपर्क करा 9960151909
त्यानुसार आमदार कदम यांनी या कामी पुढाकार घेतला असून चार लाख रुपये या कामासाठी मंजूर झाले आहेत, अशी माहिती दापोली- खेड-मंडणगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांनी दिली.
याबाबत स्थानिक पत्रकारानी आमदार कदम यांच्या दाभोळ एस.टी. स्टँडवर प्रचंड खड्डे पडले आहेत, एसटी बस मध्ये चढण्यासाठी अनेक खड्डे पार करून नागरिक, प्रवाशांना कसरतीने कसेबसे एसटी पर्यंत पोहोचावे लागत असल्याची माहिती दाभोळ भेटी समयी आमदार कदम यांना दिली होती.
यावर बोलताना आमदार योगेश कदम यांनी सांगितले की, याबाबतची तक्रार माझ्याकडे ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत पारदळे यांनी केलेली आहे. तसेच लेखी निवेदन दिले आहे. या समस्येची दखल आम्ही घेतलेली असून दाभोळ एसटी. स्टॅन्डचे सुशोभीकरण लवकरच करणार आहोत.
येथे पेवर ब्लॉक बसविणार आहोत. आमदार फंडातून त्या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी चार लाख रुपये खर्च होणार आहे.
हे सुशोभीकरण झाल्यावर नागरिकांचा तसेच तमाम प्रवाशांचा खड्ड्यातून एसटी पर्यंतचा कसरतीचा प्रवास वाचणार आहे. लवकरच या कामाला सुरुवात होईल असेही आम. योगेश कदम यांनी सांगितले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*