चिपळूण : पत्रकार निसार शेख यांची ‘माणुसकी’आली कामी, अपघातग्रस्त युवतीचे वाचले प्राण

banner 468x60

रस्त्यात कोठेही अपघात घडला असल्यास अपघासग्रस्तास तातडीने मदत करावी अशी एक सामान्य भावना आहे. परंतु, काही ठिकाणी अपघातग्रस्तांना मदत होत नाही.

🔴 तुम्हाला कोकणातल्या बातम्या 

banner 728x90

पाहायच्या असतील तर कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा 

https://chat.whatsapp.com/DVfvKdr19CxKSPzdD9Ltsy

YouTube : https://youtube.com/@kokankattalive3128?si=UdAkXVJPt9X47lwE

👉🏻 आपल्याला जाहिरात आणि बातम्या द्यायच्या असतील तर  संपर्क करा 9960151909

त्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. चिपळूणमध्ये अशीच एक घटना घडली आहे.

चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील यश ढाब्याचे मालक योगेश खोपकर यांची बहीण वैशाली गोविंद केळसिकर ही रक्षा बंधन करण्यासाठी शिरगाव येथे आली होती.

रक्षाबंधन याचा कार्यक्रम आटपून ती अलोरे येथे जात असताना शिरगाव नाक्यातील एका मोठ्या झाडाची फांदी मोडून तिच्या डोक्यावर पडली. त्यात ती जखमी झाली. यावेळी रिक्षा व्यवसायिक बाबा कोलगे यांनी तिला उचलून शिरगाव येथील एस आर पाटील यांच्या दवाखान्यात हलविले.

पण डॉ एस आर पाटील यांनी तिची प्रकृती पाहून चिपळूणला हलविण्यास सांगितले. त्यानंतर लोकशाही चॅनल प्रतिनिधी निसार शेख, रिजवाना शेख अशोक लांबे यांनी तात्काळ मोरे यांच्या रिक्षातून तिला चिपळूण येथे हलविले.

मात्र तिची प्रकृती नाजूक असल्यामुळे भाऊ योगेश खोपकर यांनी अधिक उपचारासाठी डेरवण येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्या जबड्याला मार लागला असून पाठीचे मणक्याला जबर मार लागला आहे.

तिच्यावर उपचार सुरू आहेत.तर शिरगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांनी तत्काळ घटनेची दखल घेतली आणि चिपळूण सार्वजनिक बांधकाम विभागाला याची माहिती दिली त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी यांनी पाहणी करून उद्या काही फांदया तोडण्यात येणार आहेत

मात्र सदरच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये रिक्षा व्यवसायिक बाबा कोलगे यांच्यासह पत्रकार निसार शेख यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्या महिलेवर लवकरात लवकर उपचार सुरु होण्यास मदत झाली. याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *