चिपळूण : आठवडा उलटला तरी नीलिमा चव्हाण मारेकऱ्यांचा शोध का लागत नाही ?

banner 468x60

ओमळी गावातील 23 वर्षीय नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूला आठ दिवस पूर्ण होत आले तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत.


🔴 कोकण कट्टा Live च्या whatsapp ग्रुपमध्ये सहभागी व्हा आणि पाहा कोकणातल्या बातम्या 

आपल्या मोबाईलवर

https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

👉🏻 जाहिरात आणि बातम्या देण्यासाठी संपर्क करा 9960151909

त्यामुळे आता रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील नाभिक समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली असती तर निलिमाचा जीव वाचला असता अशी भावना तिच्या भावाने व्यक्त केली आहे.

तसेच जे काम पोलिसांनी करायला हवे ते काम आम्ही करत आहोत असा आरोपही निलिमाचे नातेवाईक करत आहेत. दरम्यान नातेवाईकांकडून पोलिसांच्या भूमिकेवरही संशय व्यक्त केला जात आहे.

नेमकं काय आहे प्रकरण? चिपळूणमध्ये राहणारी 23 वर्षीय निलिमा चव्हाण ही दापोलीमध्ये स्टेट बँकेत कंत्राटी पद्धतीने कामाला होती. घरची परिस्थिती बेताची असल्याने चिपळूणपासून दूर ती दापोलीमध्ये राहून नोकरी करत होती. तर ती शनिवार आणि रविवारी नियमितपणे तिच्या ओमळी गावाला जात असत.

मात्र 29 तारखेला दापोलीतून गावी येण्यासाठी निघालेली निलिमा घरी पोहचलीच नाही. त्यामुळे तिच्या भावाने तात्काळ चिपळूण पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार नोंदवली.

अखेर दाभोळच्या खाडीमध्ये पोलिसांना तिचा मृतदेह सापडला. पण तक्रार केल्यानंतर पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केला नसल्यामुळे पुढचा अनर्थ घडला असल्याचा आरोप निलिमाच्या भावाने केला आहे.


निलिमाचे वडिल गावातच सलून व्यवसाय करतात. त्यांनी दोन मुलांचे आणि एक मुलीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. निलिमाची आई ही मानसिक आजाराने त्रस्त आहे. त्यामुळे वडिलांना हातभार लावावा या हेतून निलिमाने कमी वयात बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली.

पण निलिमाच्या अशा जाण्याने तिच्या घरच्यांवरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर मानसिक आजारातून हळूहळू सावरत असलेली तिची आई आता पुन्हा मुलीच्या जाण्याने खचली असल्याचं पाहायला मिळत आहे. तर या तपासात सीसीटीव्ही बाबत धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.

पोलीस यंत्रणेकडे असलेले सीसीटीव्ही फुटेज हे देखील उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येत आहे. कारण प्रशासनाकडून लाईट बिल न भरल्याने शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा काम करत नसल्याचं वास्तव समोर आलं आहे. पण यामुळे निलिमाच्या मृत्यूचा तपास करताना अडचण निर्माण होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *