चिपळूण : महिला सुरक्षिततेबाबत उपाययोजना करावी, युवतींची मागणी

banner 468x60

दापोली येथील स्टेट बँकेत कंत्राटी कर्मचारी असलेल्या २४ वर्षीय बेपत्ता युवतीचा मृतदेह दाभोळ समुद्रकिनारी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

👉🏻जाहिरातआणिबातम्यादेण्यासाठीसंपर्ककरा 9960151909

banner 728x90

बुडून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन दिवसांपूर्वी तिच्या घरच्यांनी दापोली पोलीस ठाण्यात आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती.

दापोली येथून चिपळूण तालुक्यात ओमळी या आपल्या गावी जाते सांगून निघालेल्या नीलिमा सुधाकर चव्हाण हिचा बुडून झालेला मृत्यू हा नेमका कशामुळे झाला हे गूढ अद्याप कायम आहे. दापोली येथून निघालेली नीलिमा चव्हाण अद्याप घरी न पोहोचल्याने तिची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.

त्यानंतर तिच्या भावाने दापोली येथील तिच्या एका जवळच्या मैत्रिणीला फोन लावला. त्यावेळेला तिने नीलिमा मी गावी ओमळी येथे ते आहे असे सांगून निघाली आहे अशी माहिती दिली. दरम्यान, बेपत्ता झालेल्या नीलिमा हिचे शेवटचे लोकेशन खेड असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

तिच्या घरच्यांनी चिपळूण परिसरातही नीलिमा हिची शोधाशोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. दापोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कंत्राटी कर्मचारी निलीमा सुधारकर चव्हाण (वय २४ रा. ओमळी, ता. चिपळूण) या शनिवार दि. २९ जुलैपासून बेपत्ता झाल्याने दापोली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती.

ही घटना मुलींसाठी, महिलांसाठी आणि इथल्या प्रशासन व्यवस्थेसाठी खूप खळबळजनक व घाबरून सोडणारी आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले. अनेक अनेक मुली कामानिमित्त बाहेरगावी असतात त्या सुरक्षित आहेत का, असा प्रश्न निर्माण होतो.

अशा घडलेल्या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरातील महिला मुली आपल्या घराबाहेर सुरक्षित आहेत का, अन्य कोणासोबत असा अनुचित प्रकार तर होणार नाही, याची दक्षता पोलिसांनीही घ्यावी असे निवेदन राष्ट्रवादी व काँग्रेस युवती यांनी मिळून दिले.

यावेळी राष्ट्रवादी युवती जिल्हा सचिव कु. प्रणिता घाडगे, काँग्रेस युवती शहराध्यक्ष गौरी हरदरे, तृप्ती कदम व प्राजक्ता मोरे आदी युवती उपस्थित होत्या.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *