कोकणच्या ‘खालुबाजा’ लोककलेचा मुंबईत भव्य जागर; ‘त्रिमूर्ती संदेश खालुबाजा पथका’चा रौप्य महोत्सव उत्साहात

banner 468x60

कोकणच्या मातीतील पारंपारिक ‘खालुबाजा’ अर्थात टिमकी बाजा या लोककलेचा दिमाखदार जागर मुंबईत पाहायला मिळाला. ‘त्रिमूर्ती संदेश खालुबाजा पथका’चा रौप्य महोत्सवी सोहळा रविवारी (दि. ५ एप्रिल २०२६) सांताक्रूझ (पूर्व) येथील पाठक टेक्निकल कॉलेज हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. गेली २५ वर्षे जपलेल्या या कलेच्या प्रवासाचा हा सोहळा साक्षीदार ठरला.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री Ashish Shelar यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी कोळी महासंघाचे अध्यक्ष आमदार Ramesh Patil होते. यावेळी खासदार Vinayak Raut यांनी खालुबाजा या लोककलेचे महत्त्व अधोरेखित करत, या कलेला शासनाचा अधिक पाठिंबा मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

दापोली तालुक्यातील इळणे गावचे सुपुत्र संदेश मुरुडकर आणि रुपेश मुरुडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ही पारंपारिक कला मुंबईत जिवंत ठेवण्याचे मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा गौरव म्हणून कार्यक्रमात खालुबाजा कलेवरील महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कुलगुरू डॉ. अर्जुन मुरुडकर यांनी मार्गदर्शन करताना लोककलेचे जतन आणि संवर्धन ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट केले.

सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते खालुबाजा पथकाचे सादरीकरण. टिमकीच्या तालावर सादर झालेली पारंपारिक वादनशैली, लेझीम आणि कोळी नृत्याने उपस्थितांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. महिलांनी सादर केलेल्या समई नृत्याने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. याशिवाय ‘खेळ पैठणीचा’ या स्पर्धेत विजेत्या महिलांना पाच पैठण्या आणि इतर सहभागी महिलांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमात Dadu Chauhan (गोल्ड मॅन) यांनी सादर केलेल्या कोळीगीतांनी रसिकांना थिरकायला भाग पाडले. रोहित राठोड यांच्या नृत्य पथकानेही कार्यक्रमाला उत्कृष्ट साथ दिली.

या सोहळ्याला समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. लता पालवणकर यांच्या भावनिक भाषणाने उपस्थितांचे डोळे पाणावले. पत्रकार, समाजसेवक, कलाकार आणि कोळी-आगरी समाजातील अनेक मान्यवरांनी या कलेच्या जतनासाठी आपला पाठिंबा दर्शवला.

मुंबईसारख्या महानगरात एकत्र कुटुंब व्यवस्थेत राहून मुरुडकर बंधूंनी कलेच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. मोठे बंधू संतोष मुरुडकर यांनी कुटुंबासाठी केलेला त्याग आणि एकोप्याने उभा केलेला हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.

कार्यक्रमात उच्चशिक्षित कुलगुरू डॉ. अर्जुन मुरुडकर यांनी विशेष मार्गदर्शन केले, त्यांच्या प्रगल्भ विचारांनी उपस्थितांना कला संवर्धनाची नवी दिशा मिळाली.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ‘त्रिमूर्ती संदेश’
महाराष्ट्रातील नामवंत बिग बॉस फेम दादूस (गोल्ड मॅन) यांनी अतिशय सुंदर कोळीगीते गायली आणि रसिकांना पाय थिरकायला लावले.


खालुबाजा पथकाने आपली पारंपारिक कला सादर करून खालु बाजा आणि नृत्य सादर करून उपस्थित जनतेची मने जिंकली. या पथकासाठी रोहित राठोड यांचे नृत्य कलापथक यांनी साथ दिली. खालु बाजावर लेझीम आणि कोळी नृत्य असा पारंपारिक कला सादर केली महिलांनी समई नृत्य सादरीकरण करून उपस्थित मान्यवरांना आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच. दशरथ डांगरे यांनी उत्कृष्ट पद्धतीने केलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या स्पर्धेत विजेत्या महिलांना एकूण ५ पैठणी आणि इतर महिलाना विशिष्ट भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.

मुंबईसारख्या महानगरात एका सामान्य कुटुंबातून आलेल्या आणि एकत्र राहणाऱ्या या आदर्श मुरुडकर परिवाराने आपल्या कला आणि एकोप्याच्या माध्यमातून उपस्थित सर्वांची मने जिंकली. मोठे बंधू बुवा संतोष मुरुडकर (संतोष मुरुडकर) यांनी आपल्या जीवनात आपल्या सुखाचा त्याग करून आपल्या परिवाराला अगदी प्रेमाने एकत्र जखडून ठेवले आहे.


या कार्यक्रमात.लता पालवणकर यांच्या भाषणाने उपस्थित प्रेक्षकांना अश्रू अनावर झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाऊन या बंधूंनी आपली पारंपारिक लोककला मुंबई शहरात जिवंत ठेवली.या संपूर्ण कार्यक्रमाची डिझाईन CORE 360 या कंपनीने केली..परेश कुळे आणि साहिल चिलबे या दोघांनी अतिशय मेहनत घेऊन डिझाइन पूर्ण केली.
या सोहळ्याला त्या कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे मा.खासदार.विनायक राऊत, समाजात प्रतिष्ठित दर्जा निर्माण करणारे कुलगुरू डॉ. अर्जुन मुरुडकर, या पथकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि मुरुडकर कुटुंबीयांच्या हृदयस्थानी असणारे शासन पुरस्कार पत्रकार. दिलीपजी देवळेकर, अखिल भजन हितवर्धक संघ अध्यक्ष बुवा भगवान लोकरे, या पथकाचे हितचिंतक, आधारस्तंभ.राजहंस टपके, कोळी महासंघाचे औद्योगिक प्रमुख.अमित जोगुरे, मधुमेह तज्ञ डॉ. सुरेश सावर्डेकर, गीतकार.अतुल भोईर, आधारस्तंभ संगीतकार.अनिल वैती, युनायटेड इंडियाचे अधिकारी .विजय वडतकर, महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहीर.चिंतामणी शिवडीकर उर्फ काकुस, (अगो पापलेट वाली फेम)कोळी नृत्याचे बादशहा.अरुण पेदे, मुरुडकर बंधूंचा सन्मान करणारे रोहिदास समाज पंचायत संघ मुंबईचे अध्यक्ष.मयुर देवळेकर, केशव पंदिरकर, प्रतिष्ठित लेखक डॉ. मुकुंद कुळे, स्थानिक नगरसेवक.गीतेश राऊत, पवई पंचक्रोशी सेवा संस्थेचे. अध्यक्ष महादेवजी वडतकर साहेब, इळणे गावचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रमोद वडतकर,.एकनाथ कुळे, कुलस्वामिनी पतपेढी संस्थापक.संजय वाळंज, वर्सोवा कोळी महिला सामाजिक संस्था मा. अध्यक्ष, धडाडीच्या नेत्या.सुगंधाताई पेदे, या पथकाचे आधारस्तंभ.सुभाष पालवणकर साहेब, शाहीर.राजेश खर्डे, या पथकाला वेळोवेळी मदत करणारे आणि पथकाची प्रसिद्धी करणारे,पत्रकार.दिनेश गावणूक, बौद्धजन पंचायत समिती उपाध्यक्ष.विनोद मोरे, गावचे धडाडीचे नेते संदेश मोरे,.राजू मुरुडकर, गायिका ऋतिका मुरुडकर,.विनायक मुरुडकर, महाराष्ट्र ऑर्केस्ट्रा असोसिएशन अध्यक्ष.सुभाष जाधव,यांसह कोळी महासंघ, कला आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्तिमत्व उपस्थित होते. गावच्या अनेक मंडळींनी तसेच कोळी समाजाच्या लोकांनी आपली जास्तीत जास्त उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. अत्यंत दिमाखदार झालेला हा सोहळा नवीन पिढीसाठी एक प्रेरणादायी संदेश ठरला आहे.


कोकण आणि कोळी आगरी समाजाचा टिमकी बाजा मुंबई शहरात जिवंत ठेवल्यामुळे संदेश मुरुडकर आणि रुपेश मुरुडकर या दोन बंधूंचे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. यांचे अनेक कार्यक्रम करून प्रसिद्धी मिळवून देणारे आमदार रमेशदादा पाटील, या कलापथकाचे आधारस्तंभ, हितचिंतक आणि या कला पथकाला समाजात उच्च स्थान देणारे आणि कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, शाहीर चिंतामणी शिवडीकर उर्फ काकुस, या कलापथकाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे गीतकार मोहित रामले,सदैव पाठीशी असणारे मच्छीमार विकास अध्यक्ष.सनी दादा वालिका,आपल्या आईसारखी पाठीशी असणाऱ्या, मरोळ मासळी बाजार समितीचे अध्यक्षा राजेश्री भानजी, मंडळाचे हितचिंतक प्रकाशजी बटावळे साहेब सनी वालिका दादा, या कला पथकाला प्रेरणा देणाऱ्या वर्सोवा गावच्या.राखी खर्डे ताई, बुवा संजय मुरुडकर,. समाजसेवक
.जगन्नाथ मुरुडकर,
.बाबुराव मुरुडकर साहेब,.सुरेश विनेरकर, या पथकाचे उपाध्यक्ष. धर्माजी मुरुडकर, .बाळाराम खोपकर,. पप्पू केळशीकर,.पांडुरंग केळशीकर,
. जनार्दन विनेरकर, आणि उपस्थित सर्व प्रेक्षक आणि मान्यवर मंडळी अशा अनेक दिग्गजांनी या कलाकारांना खंबीरपणे पाठिंबा दिला आहे .
या दोन बंधूंनी आपल्या गावचे, तालुक्याचे आणि महाराष्ट्राचे नाव जागतिक पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला आहे. गेली २५ वर्ष आपली कला जिवंत ठेवण्यासाठी ज्या ज्या वाजंत्री मंडळींनी सहकार्य केले अशा सर्व माऊलींचे आभार व्यक्त केले. सर्व पत्रकार बंधू भगिनी, सह्याद्री दूरदर्शन वाहिनी, मुंबई आकाशवाणी, कोकण कट्टा न्यूज, रत्नागिरी आकाशवाणी केंद्र, लोकशाही मराठी, आयबीएन लोकमत, झी 24 तास, आणि इतर शासकीय आणि आणि सर्व खाजगी वाहिनींचे, सहकार केल्याबद्दल तसेच आजवर ज्या ज्या लोकांनी आपल्या कलेसाठी सहकार्य केले त्यांचे पत्रकारांशी बोलताना आभार मानले.

गेल्या २५ वर्षांत या पथकाला साथ देणाऱ्या सर्व वाजंत्री कलाकारांचे, तसेच विविध माध्यमांचे आणि रसिकांचे मुरुडकर बंधूंनी आभार मानले. “आई-वडिलांचे आशीर्वाद, कुटुंबाचा पाठिंबा आणि रसिकांचे प्रेम यामुळेच ही कला आजही जिवंत आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कोकणातील ‘खालुबाजा’ या लोककलेला मुंबईत नवसंजीवनी देत, ती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य ‘त्रिमूर्ती संदेश खालुबाजा पथका’कडून होत असून, हा रौप्य महोत्सव त्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *