Konkan railway : कोकण रेल्वे मार्गावर दिवाळी स्पेशल गाडी शुक्रवारपासून धावणार

banner 468x60

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गुजरात सुरतजवळील उधना ते मंगळुरू अशी कोकण रेल्वेमार्गे धावणारी विशेष गाडी दि. 3 नोव्हेंबर 2023 पासून धावणार आहे.

आठवड्यातून दोन दिवस ही गाडी दि. 1 जानेवारी 2024 पर्यंत चालवली जाणार आहे. दिवाळीसाठी 09057/ 09058 ही गाडी सुरतजवळील उधना ते मंगळुरू जंक्शन दरम्यान चालवली जाणार आहे.

उधना ते मंगळूर दरम्यान या गाडीच्या फेर्‍या दि. 3, 5, 10, 12, 17, 19, 24 तसेच 26 नोव्हेंबर 2023 तसेच डिसेंबर महिन्यात देखील दि. 31 डिसेंबरपर्यंत आठवड्यातून दोन दिवस ही गाडी धावणार आहे. मंगळुरू ते उधना या मार्गावर दि.4 नोव्हेंबर 2023 पासून या गाडीच्या फेर्‍या सुरू होणार आहेत.

ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम, करमाळी, मडगाव जं., कानाकोण, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल या स्थानकांवर थांबे घेणार आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *