नाबार्डच्या पायाभूत सुविधेतर्गत सन २०१५/१६ मध्ये देवरुख-वाशी-चाफवली-देवळे मार्गावर सुमारे ८ वर्षांपूर्वी सव्वादान कोटी रुपये खर्चुन पूल शासनान नागरिकांसाठी बांधला आहे पण अद्याप त्यावर वाहतूक नाही.
हा पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार, असा सवाल देवरुखच्या क्रांती व्यापारी संघटनेचे अध्यक्ष निखिल कोळवणकर यांनी विचारला आहे.चाफवली, देवळे, करंजारी, चोरवणे, नाणीज भागातील लोकांना देवरुखला जोडण्यास हा पुल महत्वाची कामगिरी बजावणार आहे. शासनाची पूल उभारण्यापाठीमागचा उद्देश चांगला होता.
परंतु पूल पूर्ण होऊन ८ वर्षे झाली तरीही नागरिक त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत, अशी खंतही कोळवणकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पर्यटनासाठी अनुकूल आहे.
त्यामुळे पूल वाहतुकीस लवकरात लवकर खुला करा नाही तर भुताचा पूल म्हणून पर्यटनस्थळ घोषित करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.देवळे-चाफवली-करंजारी- चोरवणे-नाणीज भागातील लोक देवरूखला कामासाठी लवकर पोहोचू शकतात.
त्याबरोबर देवरूख बाजारपेठेला त्याचा फायदा होऊ शकतो. अनेक गावे देवरूखला जोडून थेट व्यावसायिक संबंध प्रस्थापित होऊन ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते तर या सुविधेचा लाभ का मिळू नये, असा सवाल कोळवणकर यांनी विचारला आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















