गुहागरमध्ये डोंगर खचला, पाचेरी सडा मार्ग बंद

गुहागरमध्ये डोंगर खचला, पाचेरी सडा मार्ग बंद

banner 468x60

गुहागर तालुक्यात पाचेरी सडा येथे मार्गावरील येथे डोंगर खचण्याचा प्रकार घडला असून माती रस्त्यावरती आली आहे. त्यामुळे येथील बौद्धवाडी येथील काय कुटुंबांना त्यामुळे स्थलांतर करण्यात आल आहे.

गुहागर तालुक्यातील अति दुर्गम भाग असलेल्या पाचेरी सडा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दरड रस्त्यावरती आली रस्त्याच्या खालच्या साईटला 42 कुटुंबिये आहेत.. लोक वस्ती मोठ्या प्रमाणात आहे रोड लगत असणाऱ्या 11 घरांना प्रशासनाकडून स्थलांतरीच्या नोटीसा देण्यात आले आहेत.

banner 728x90

11 कुटुंब पैकी नऊ कुटुंब ही मुंबईला असतात तर उर्वरित तीन कुटुंबांना येथीलच विहारा मधे स्थलांतरित करण्यात आले आहे घटनास्थळी गुहागरचे तहसीलदार परीक्षेत पाटील, बांधकाम विभागाचे अधिकारी, तसेच पाणी विभागाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्यावरती आलेली माती जेसीबीच्या साह्याने बाजूला करून रस्ता मोकळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गुहागर चे तहसीलदार पाटील यांनी भुगर्भ तज्ञ यांना येऊन या घटनेची पाहणी करण्याचे पत्र दिले होते. येथील ग्रामस्थांना जी पिण्याची पाण्याची सोय नव्हती त्यासाठी गुहागर प स कडून त्यांना एक पाण्याची टाकी तात्काळ उपलब्ध करून देऊन देण्यात आली आहे.

banner 728x90

Response (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *