चिपळुण : खेडनंतर चिपळूणात साडेआठ लाखाची वीजचोरी

banner 468x60

खेडमध्ये वीजचोरी प्रकरण गाजल्यानंतर आता चिपळूणात साडेआठ लाखाची वीजचोरी समोर आली आहे. जवळपास 17 महिन्यांपासून चोरीची वीज वापरुन महावितरण कंपनीचे
8.56 लाखाचे नुकसान केलं आहे.

चिपळूण तालुक्यातील तनाळी येथील रमेश कृष्णाजी वैद्य आणि सहदेव विष्णू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तनाळी येथे घडली आहे. याबाबतची फिर्याद विजय राजेश धरमसारे (31, उप-कार्यकारी अभियंता, भरारी पथक, पेण) यांनी दिली आहे.

रमेश वैद्य आणि सहदेव चव्हाण यांनी अनधिकृतपणे 23 नोव्हेंबर 2022 ते 23 एप्रिल 2024 या 17 महिन्याच्या कालाधीत 47962 युनिट्स वीज चोरुन वापरली. यातून 8 लाख 56 हजार 360 रुपयांची वीज चोरी करुन महावितरण कंपनीचे नुकसान केले आहे.

याप्रकरणी विजय धरमसारे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैद्य व चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *