गुहागर तालुक्याला वादळी वाऱ्याने पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे अनेक घरांची पडझड झाली रस्ते खचले आहेत झाड सुद्धा रस्त्यावरती पडत आहेत अशातच गुहागर तालुक्यातील तवसाळ फेरीबोट वरती जाण्याच्या मार्गावरती एक सुरुचे झाड रस्त्यावरती आडवे पडल्याने वाहतूक काही काळ बंद झाली आहे.
हे झाड पडल्यामुळे वीज वाहिन्या खाली आल्या आहेत. गुहागर तालुक्यामध्ये रोजच विजेचा लपंडावही सुरू आहे अनेक ठिकाणी वीज वाहिनी वरती झाडं कोसळत आहे .
काही गावांमध्ये सुद्धा दोन दोन ते तीन-तीन दिवस लाईटचा पत्ताच नाही .फेरीबोट मार्गावरून रत्नागिरी जाण्याचा हा मार्ग आहे त्यामुळे ते झाड रस्त्यावरती पडल्यामुळे काही काळ वाहतूक बंद होती.
तसेच गुहागर तालुक्यातील नरवण गावातिल दिनेश आरेकर यांच्या पोल्ट्री फार्म वरती माडाचे झाड पडून त्यांचे 33 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे गुहागर तालुक्याला आज दिवसभर पावसाने झोडपून काढले आहे मात्र कुठेही जीवितहानी झाल्याची नोंद नाही

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















