दापोली : महिलेच्या खुनाचा प्रयत्न, 7 महिन्यानंतर पकडला, आरोपी मंगेश चौगुलेला 10 वर्षाची शिक्षा,

banner 468x60

विवाहितेच्या घरात घुसून तीच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करत खुनाचा प्रयत्न केलेप्रकरणी आरोपी मंगेश मधुकर चौगुले, रा. टाळसुरे, ता. दापोली, जि. रत्नागिरी यांस डॉ. सुधीर एम. देशपांडे, अति. सत्र न्यायालय-1 खेड यांनी भा.द.वि. कलम 307 या कलमाखाली 10 वर्ष सश्रम कारावांस आणि रुपये 50,000/- इतका दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा तसेच भा.द.वि. कलम 506 या कलमाखाली 2 वर्षे शिक्षा आणि 10,000/- इतका दंड आणि दंड न भरलेस 1 महिना साधी कैद ठोठावली आहे.

banner 728x90


दापोली तालुक्यातील टाळसुरे, येथील महिलेवर तीच्या नवर्‍याचा मावस भाऊ मंगेश मधुकर चोगुले हा वारंवार त्रास देऊन तिची मानसिक छळवणूक करत होता.

मंगेश हा त्या महिलेस सतत फोन करायचा. या महिलेने त्याचे फोन उचलला नाही या रागातून मंगेश यांने महिलेच्या घरात घुसून ती पडवीमध्ये भांडी घासत असताना तिचे गळयावर ठार मारण्याच्या इराद्याने चाकुने वार करुन तीला जखमी केले, आणि फरार झाला.

या प्रकरणात मंगेश चौगुले 7 महिन्यानंतर पकडला गेला त्यानंतर 1.5 वर्षे न्यायालयीन कोठडीत होता. या प्रकरणी कोर्टात केस चालली आणि पिडीत महिलेचा जवाब विचारात घेवून आणि तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची गंभीरता पुराव्यासह शाबीत झाल्यावर कोर्टाने याकामी मंगेश चौगुले यास दोषी धरले आणि त्यास 10 वर्षे कारावास व 50 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

या प्रकरणी सरकार पक्षातर्फे एकुण 14 साक्षीदार आले. आणि परिस्थितीजन्य पुरावा कोर्टासमोर मांडण्यात आला. सरकारी वकील अ‍ॅड. मृणाल जाडकर यांनी सरकार पक्षाच्या बाजुने, युक्तीवाद केला तपासीक अंमलदार अनिल लाड, पोलीस निरीक्षक दापोली पोलीस ठाणे तसेच सागर भगवान पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक दापोली पोलीस ठाणे आणि दापोली पोलीस आणि सुदर्शन गायकवाड यांचे सहकार्य लाभले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *