नारायण राणेंचं गेम होणार?, राऊत आघाडीवर,पराभवाची की विजयाची हॅटट्रिक? एक्झिट पोलमध्ये काय सांगतायत पाहा?

banner 468x60

केंद्रीय मंत्रीपदी राहिलेल्या नारायण राणे Narayan Rane विजयी होत असल्याचा अंदाज टीव्ही 9 पाॅलस्ट्राट एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात येत आहे. कोकणात ठाकरेंना नेहमीच साथ मिळाली आहे.

banner 728x90

शिवसेनेच्या विरोधात जाणाऱ्या नारायाण राणेंना विधानसभा निवडणुकीत पहिला पराभव ठाकरेंचे शिलेदार वैभव नाईक यांच्याकडून 2014 ला पहिल्यांदा स्वीकारावा लागला होता. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलेले राणे विजयी होताना दिसत आहेत.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात राज्यमंत्री नारायण राणे यांना भाजपने उतरवले. त्यामुळे ठाकरेंच्या शिलेदार विनायक राऊत यांना ते धोबीपछाड देतील, असाच अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे.पराभव झालेल्या राणेंनी पुन्हा काँग्रेसने Congress वांद्रे विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली.

या निवडणुकीत देखील राणेंना पराभावाचा सामना करावा लागला. राणेंना विधान परिषदेवर घेत त्यांचे काँग्रेसने पुनर्वसन केले. मात्र, पुढे 2019 लोकसभा निवडणुकीच्या आधी राणेंनी काँग्रेसचा हात सोडून भाजपात प्रवेश केला.

“मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला वाटेल, मी विजयी होणार आहे. मला विजयाची 100 टक्के खात्री आहे, कार्यकत्यांनी रॅलीची तयारी केली”, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Loksabha) मतदारसंघातून विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.


रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात यावेळी जवळपास 59.23 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मात्र 2019 सालच्या तुलनेत हे मतदान जवळपास सहा टक्क्यांनी कमी आहे. 2019 ला या मतदार संघात 65.06 टक्के मतदान झाले होते. हा घटलेला मतांचा टक्का कोणाचे गणित बघडवणार याची रंगतदार चर्चा मतदार संघात होत आहे.

शिवसेनेच्या फुटी नंतर हा मतदार संघ शिंदे गटाला मिळावा यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न सुरू होते. त्यामुळे नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर व्हायला उशीर झाला. तो पर्यंत विनायक राऊत यांनी प्रचारात मुसंडी मारल्याचे चित्र होते. या मतदार संघात भाजपचा एक आमदार आहे तर शिवसेना ठाकरे गटाचे दोन आमदार आहेत. शिंदे गटाचे दोन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आमदार आहे. त्यामुळे राणे यांची भिस्त शिंदे गटाच्या आमदारांवर आहे.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *