मुंबई-गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडला.
किरण विचारे असे मृत्यू तरुणाचे नाव आहे. किरण हा वरवडे येथील असल्याचे समजते. तो आंबेड बुद्रुक येथील पोस्टाचा कर्मचारी असून काम आटोपून तो रत्नागिरीच्या दिशेने जात होता.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने कंटेनर निघाला होता. यावेळी वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनर चालक एका गाडीला ओव्हरटेक करत असताना.
समोरून दुचाकी (एमएच-०८-बीए-८५०४) ने येणाऱ्या किरण विचारे याला जोरदार धडक दिली. यामध्ये किरण दुचाकीसह कंटेनरच्या पुढील चाकाखाली सापडला. यातच त्याचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.
वांद्री पोलिस पाटील सुनील शिगवण यांनी संगमेश्वर पोलिसांना याची माहिती देताच संगमेश्वरचे पोलिस निरीक्षक बगळे, पोलिस अंमलदार राजेश शेलार, सहायक पोलिस
उपनिरीक्षक प्रशांत शिंदे, हेड कॉन्स्टेबल सतीश कोलगे, अंमलदार मुजावर, अंमलदार पवार, हेड कॉन्स्टेबल सचिन जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्याचे काम सुरु आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















