पाटबंधारे प्रकल्प बांधकाम उपविभाग क्र. ३ मध्ये लांजा कार्यालयात कार्यरत असलेल्या एका चौकीदाराने कार्यालयाच्या आवारातच फिनेल पिऊन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
रविवारी (ता. १) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अत्यवस्थ कर्मचाऱ्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे त्याचे म्हणणे आहे.
पोलिसांनी सांगितले, की सतीश सदाशिव कासारे (३१, रा. मंडणगड, सध्या लांजा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. सध्या ते जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. कासारे चौकीदार म्हणून अनुकंपा तत्त्वावर २०२१ मध्ये नोकरीला लागले; मात्र मागील काही दिवसांपासून ते आजारी होते.
दोन महिने पगार नव्हता. आजारपणाचा झालेला खर्च, कुटुंबाची होणारी उपासमार त्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले. प्रमाणपत्र सादर करूनही वरिष्ठ अधिकारी त्यांना कामावर हजर करून घेतले नव्हते. या त्रासाला कंटाळून कार्यालयाशेजारी असलेल्या मोटीरीत बसून फिनेल प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta Live, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
Editor – Tejas Borghare
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*