गुहागर : साडेसात तोळे सोन्यासह हरवलेली बॅग केली परत; मोहम्मद जांभारकर, खूबेब जांभारकर यांचा प्रामाणिकपणा, पोलिसांकडून गौरव

साडेसात तोळे सोन्यासह हरवलेली बॅग केली परत; मोहम्मद जांभारकर, खूबेब जांभारकर यांचा प्रामाणिकपणा, पोलिसांकडून गौरव

banner 468x60

प्रवासी प्रवास करताना घाईघाईत अनेक जण आपला सामान विसरुन जातात किंवा आपली महत्त्वाची बॅग विसरुन जातात. यामुळे अनेकदा हा सामान चोरी होऊन जातो.

परत मिळत नाही किंवा मग काही प्रामाणिक व्यक्ती असेल तर परतही मिळून जातो. अशीच एक घटना गुहागरमध्ये समोर आली आहे.

गुहागर मधून विरारला जाणाऱ्या एका महिलेची बॅग गर्दी असल्याने हरवलेली होती. बसमध्ये एकसारखी दिसणारी बॅग असल्याने नजरचुकीने बॅगची अदलाबदल झाली.

साडेसात तोळे सोन्यासह हरवलेली महिलेची बॅग मोहम्मद शब्बीर जांभारकर, खूबेब हनीफ जांभारकर राहणार पडवे तालुका गुहागर यांनी माणगाव पोलिसांकडे बॅग सुपुर्द केली.

तरुणांनी दाखविलेल्या या प्रामणिकपणाबद्दल माणगाव पोलिसांनी कौतूक करुन त्यांचा गौरव केला आहे.या तरुणांनी मिळालेली बॅग जशीच्या तशी न उघडता त्याच रात्री माणगाव पोलिस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.


माणगाव पोलिस उपअधीक्षक सूर्यवंशी (DYSP माणगाव) पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील साहेब आणि API भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन मोहम्मद जांभारकर, खूबेब जांभारकर यांचा कौतुक केलं आहे. बॅगमालक सकपाळ यांनी या तरुणांचे ऋण व्यक्त करुन आभार मानले.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *