शृंगारतळी : सर्व कॅमेरे बंद , याचाच फायदा घेत गोविंदा मोबाईल शॉपीत चोरी तब्ब्ल 31 लाखांच्या मोबाईलची चोरी

शृंगारतळी : सर्व कॅमेरे बंद , याचाच फायदा घेत गोविंदा मोबाईल शॉपीत चोरी तब्ब्ल 31 लाखांच्या मोबाईलची चोरी

banner 468x60

शृंगारतळी बाजारपेठेतील गोविंदा मोबाईल शॉपीत चोरी झाली. शनिवारी मध्यरात्री चोरटयांनी सुमारे ३० लाखांचा किमती ऐवज व ९० हजारांची रोकड लांबवली.

घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, अद्याप चोरट्यांचा माग काढता आलेला नाही. श्रृंगारतळी बाजारपेठेत मुख्य रस्त्याच्या कडेला असलेल्या गोविंदा मोबाईल शॉपीचा मागील दरवाजा फोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला.

banner 728x90

चोरट्यांनी किमती मोबाईल व टॅब लांबविले. सुमारे ३० लाखांचा ऐवज त्यांनी चोरुन नेला. तसेच ९० हजारांची रोकडही लांबवली. या दिवशी सीसीटीव्ही बंद होते. शॉपीत एक दिवसापूर्वीच मोबाईल, टॅब असे किंमती साहित्य भरण्यात आले होते.

बाजूच्या मेडीकल दुकानाच्या कॅमेऱ्यामध्ये तीन चोरटे कैद झाले आहेत. या घटनेमुळे शृंगारतळीसह गुहागरमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. चोरीचा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक प्रमोद मोहिते घटनास्थळी दाखल झाले.

रत्नागिरी पोलीस उपअधीक्षक जयश्री गायकवाड, चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजमाने, गुहागर पोलीस उपनिरीक्षक सुजित सोनावणे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

रत्नागिरीतून श्वान पथक, ठसे तज्ज्ञही दाखल झाले होते. श्वान हस्तक सुदेश सावंत यांनी माही या श्वानाद्वारे परिसर पिंजून काढला.

मात्र, चोरट्यांचा माग निघाला नाही. घटनास्थळी दोन कटावन्या व एक पोपट पाना आढळून आला. या शॉपीमध्ये २०११ मध्ये चोरीची घटना घडली होती. या चोरीचा उलगडा दोन वर्षांनी झाला होता.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *