गुहागर : निवोशीत फुलात घडले गणपती बाप्पाचे दर्शन

banner 468x60

निसर्गाच्या अनेक गोष्टींमध्ये काहीना काहीतरी अद्भुत आहे, निसर्ग ही परमेश्वराने माणसाला विनामूल्य दिलेली एक सुंदर देणगीच म्हणावी लागेल.

निसर्गातील प्रत्येक घटकामध्ये काहीना काही तरी आश्चर्य दडलेलं आहे आणि म्हणूनच या भूतलावर निसर्गाचे अनेक चमत्कार पाहायला मिळतात.

असाच एक निसर्गाचा अद्भुत चमत्कार रत्नागिरी जिल्हा, गुहागर तालुक्यातील निवोशी येथील दणदणेवाडी परिसरात पाहायला मिळाला.


शुक्रवार, दिनांक-21 जून 2024 रोजी हिंदू धर्मातील पवित्र अशा वटपौर्णिमा सणाच्या दिवशी सायंकाळी 7 च्या दरम्यान निवोशी येथील दणदणेवाडी येथे अनोळखी अशा दुर्मीळ प्रजातीच्या रानवनस्पतीच्या पानावर एक लाल-गुलाबी मिश्रित रंगाचं उमललेल्या फुलात गणपतीची प्रतिकृती अगदी ठळकपणे येथील रहिवाशांच्या नजरेत पडली.

दुर्मीळ परंतु निसर्गातील सकारात्मक ऊर्जा आणि त्या उर्जेतून धार्मिक महत्त्व प्राप्त करून देणारा हा निव्वळ योगायोग. ह्या रान वनस्पतीच्या फुलामध्ये ‘श्री गणेशाचे दर्शन’ घडले,हे येथील रहिवाशांचे खरे तर भाग्यच म्हणावे लागेल.

निसर्गाच्या अशा रम्य गोष्टींचे आकर्षण, विविध घडणारे चमत्कार माणसाला सकारात्मक ऊर्जा निर्माण करून देत असते. असे चमत्कार मानवजातीला एक प्रकारे आवाहनचं म्हणावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *