दापोली : खेम धरणात बुडालेला मुलगा अद्याप सापडला नाही, मंगळवारी NDRF ची टीम शोधकार्य करण्यासाठी येणार

Screenshot

banner 468x60

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. सर्व धरण तुडुंब भरली आहेत. हर्णैमधील खेम धरणात चार मुले पोहायला गेली होती. यामध्ये कल्पेश बटावळे हा 19 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला असून इतर मुले सुखरूप आहेत.

कोकणातील बातम्या पाहा Youtube वर
https://youtube.com/@kokankattalive312?si=x6cghsPahZsXs_8D

सोमवारपासून शोधकार्य सुरु आहे मात्र स्थानिक प्रशासनाला अजूनही यश आलं नाहीय. यामुळे उद्या मंगळवारी सकाळी NDRF ची टीम शोधकार्य करण्यासाठी येणार आहे.

दापोली तालुक्यातील सातांबा गावातील ही चार मुले आहेत. दापोली येथे जात असताना घरी न येता हे चारजण हर्णैयेथील खेम येथील धरणावर गेले होते.

आंघोळ करण्यासाठी धरणात उतरले असता यामध्ये कल्पेश बटावळे हा 19 वर्षाचा मुलगा पाण्यात बुडाला असून इतर मुले सुखरूप आहेत.

तात्काळ पोलिस यंत्रणा उपस्थित राहून शोधकार्य करण्यात आलं मात्र अंधार असल्यामुळे आणि मुसळधार पाऊस , पाणी खोल असल्यामुळे शोधकार्य सकाळी करण्यात येणार असल्याची माहिती दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोंबे यांनी दिली होती.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *