Kankavli News: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
उधना जंक्शन ते मंगळुरू अशी द्वि-साप्ताहिक विशेष गाडी धावणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, गाडी क्र. ०९०५७ उधना जं. ते मंगळुरू जं. विशेष रेल्वे उधना येथून ३१ मार्च आणि ३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता सुटेल.
परतीसाठी गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. ते उधना जं. मंगळुरु येथून १ आणि ४ एप्रिल रोजी रात्री १० वाजता सुटेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड,
थिविम, करमाळी, मडगाव, कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशनवर थांबेल.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















