खेड : एसटी गाड्यांचे बिघाडसत्र सुरूच

banner 468x60

खेड बसस्थानकातून ग्रामीण भागात मार्गस्थ होणाऱ्या बसफेऱ्यांमध्ये तांत्रिक बिघाडाचे सत्र अजूनही सुरूच आहे. सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास बसस्थानकातून सुटलेली खेड- आपेडे बस भरणे येथील नवभारत हायस्कूलसमोर अचानक बंद पडली.

यामुळे प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. २० ते २५ मिनिटांनंतर दुसरी बस दाखल झाल्यानंतर प्रवासी मार्गस्थ झाले. उन्हाळी सुट्टीमुळे ग्रामीण भागात धावणाऱ्या बसफेऱ्यांना गर्दी उसळत आहे.

येथील बसस्थानकातून आधीच बसफेऱ्या विलंबाने मार्गस्थ होत आहेत. त्यातच तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरूच आहे. येथील बसस्थानकातून मार्गस्थ झालेली खेड-आपेडे बस नवभारत हायस्कूलसमोर अचानक बंद पडली.

बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरवण्यात आले. २० ते २५ मिनिटे प्रवाशी उन्हातच ताटकळत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *