अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी मंगळवारी रत्नागिरीसह दापोली, चिपळूण व राजापुरात समाजबांधवांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होवून संतप्त नागरिक पोलीस स्थानकांवर धडकले.
कोकणातील सर्व बातम्या पाहण्यासाठी जॉइन करा कोकण कट्टा लाईव्ह व्हॉट्सअप ग्रुप
https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi
दापोलीनंतर खेडमध्ये काही जणांनी सोशल मिडियावर आक्षेपार्ह मजकूर टाकल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मात्र स्थानिक पोलीस आणि मनसेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय बुटाला, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह हिंदू बांधवानी संयमाची भूमिका घेतली आहे.
त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. कुठेही वाद निर्माण झाला नाहीय. दापोलीनंतर खेडमध्येही काही समाजकंटकांनी सोशल मिडीयावर आक्षेपार्ह मजकूर टाकून संपूर्ण तालुक्यातील वातावरण बिघडविणाचे काम केले आहे, असे हिंदूत्ववादी संघटनांचे म्हणणे आहे.
खेड तालुक्यात अशा आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन धर्मियांमध्ये धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याने खेडमध्ये पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी वाढविण्यात आला आहे. बुधवारी सकाळीच मनसेचे राज्य सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर,
माजी नगराध्यक्ष बिपीन पाटणे, भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी संजय बुटाला, भाजपाचे तालुकाध्यक्ष अनिकेत कानडे यांच्यासह तमाम हिंदु बांधव खेड पोलीस स्थानकासमोर धडकले आणि आक्षेपार्ह मजकूर टाकणार्या तरुणांविरोधात तक्रार देऊन या समाजकंटकांना तात्काळ अटक करून
गुन्हा दाखल करा आणि कडक शासन करा, अशी मागणी केली आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर खेड तालुका शांतता कमिटीची बैठक पार पडली असून खेडवासियांना शांततेचे आवाहन येथील प्रशासन व पोलिसांच्यावतीने करण्यात आले आहे.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















