खेड शहरात डेंग्यूच्या साथीने पुन्हा डोके वर काढल्याने आरोग्य यंत्रणांसह नागरिकांची चिंता वाढली आहे. झपाट्याने फैलावत असलेली डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा पुढे सरसावली आहे.
कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेक्षणाची मोहीम अधिक गतीमान करण्यात आली आहे. डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळणाऱ्या भागावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनीही पुरेपूर खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेकडून करण्यात येत आहेत. यापूर्वी फैलावलेली डेंग्यूची साथ आटोक्यात आल्याचा दावा करणाऱ्या आरोग्य यंत्रणांची पुन्हा झोप उडाली आहे. सर्वेक्षणासाठी ६ कर्मचारी तैनात करत पुन्हा डोअर टू डोअर सर्वेक्षणाची मोहीम राबवण्याची नामुष्की ओढवली आहे.
बहुतांश डेंग्यू सदृश्य रूग्ण खासगी रुग्णालयांमध्येच उपचार घेत असल्याने सतर्क झालेल्या आरोग्य यंत्रणांनी संबंधित रुग्णांची माहिती घेण्यास सुरुवात केल्याचे समजते. तसेच लॅबोरेटरीधारकांनाही रक्त तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची नोंद ठेवून माहिती देण्याबाबत सूचित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















