खेड : बहिरवली मोहल्लामध्ये मध्यरात्री घराला आग, अब्दुला चौगुले यांचं लाखोंचं नुकसान

banner 468x60

खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहीरवली न १  मोहल्ला येथे  बुधवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास एका घराला  अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झालं आहे. ही आग खेड नगर पंचायत च्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणल्याने पुढीलअनर्थ टळला.

banner 728x90

बहीरवली मोहल्ला येथील रहिवाशी अब्दुला युसुफ चौगुले यांच्या मालकीच्या घराला मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अचानकआग लागली ही आग इतकी भीषण होती की 

आगीत घरातील साहित्य जळून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या आगीची माहितीस्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्याने खेड अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले 

मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन बंबाला अपुऱ्यारस्त्या मूळे पोहचता न आल्याने कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक टाकी मध्ये पंप टाकून आग आटोक्यात  आणण्यात यश आलं आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *