गुहागर : सरपंचानेच भरल्या 40 हजारांच्या खोट्या नोटा, अतुल लांजेकरवर गुन्हा दाखल

banner 468x60

गुहागर तालुक्यातील शृंगारतळीमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील एटीएममध्ये जवळपास ४० हजार रुपयांची भरलेली रोकड बोगस असल्याचं समोर आलं आहे.

banner 728x90

यामध्ये 500 रूपयांच्या तब्बल 80 नोटा बोगस सापडल्या आहेत.गुहागर तालुक्यातील झोंबडी सरपंच अतुल अनंत लांजेकर याच्यावर गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मात्र अतुल अनंत लांजेकर याने या नोटा कुठून आणल्या एवढी मोठी रोकड आणली कशी असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान अतुल अनंत लांजेकर याच्याकडे अजूनही काही बोगस नोटा आहेत आणि याचा मास्टरमाईंड कोण आहे याचा तपास गुहागर पोलीस करत आहे.

बँक ऑफ इंडिया शृंगारतळी शाखेला लागूनच बाहेर एटीएम आहे. ज्यामध्ये पैसे काढताही येतात आणि पैशाचा भरणाही करता येतो.

30 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान, एटीएममध्ये पैशाचा भरणा करताना मशीनमध्ये अतुल लांजेकर याच्या खात्यावर भरणा केलेल्या 40 हजार रुपये किमतीच्या 500 रुपये किमतीच्या एकूण 80 बनावट नोटा आढळून आल्या.

या बनावट नोटा असल्याची लांजेकर यांना जाणीव असतानाही त्यांनी सदरच्या बनावट नोटा स्वतःकडे बाळगून त्या नोटा बँकेच्या कॅश डिपाँझीट मशीनमध्ये भरुन त्याचा वापर केला आहे.

लांजेकर याच्याविरोधात दिलेल्या तक्रारीनुसार 33/2024 भा.दं.वि. कलम 489 (ब) 489 (क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास गुहागर पोलीस करत आहेत.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *