गुहागर तालुक्यात सलग दोन दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर झाडे पडण्याचा प्रकार घडत आहे तर अडूर कोंड कारूळ येथे घरावर संरक्षक भिंत कोसळून घराचे नुकसान झाले आहे .

प्रशासनाने घरातील सदस्यांना मुसळधार पाऊस सुरू राहिल्यास अन्य ठिकाणी राहण्याची सूचना दिली आहे तालुक्यातील अडूर कोंड कारुळ येथील राजेश रमेश जाक्कर यांच्या घराची संरक्षक भिंत शेजारील दिनेश शांताराम असगोलकर यांच्या घरावर पडून घराच्या भिंतींना तडा व छताचे नुकसान झाले आहे
दिनेश असगोलकर यांचे 75,500 रुपयाचे नुकसान झाले आहे तर राजेश जाक्कर यांचे 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे सदर नुकसानीचा पंचनामा करून महसूल विभागात याची नोंद करण्यात आली आहे
गुहागर तालुक्यात गुरुवारी घेतलेल्या पावसाच्या नोंदीमध्ये 83 मिलिमीटर पाऊस पडला असून आत्तापर्यंत एकूण 629.60 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे

वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !
कोकणातल्या बातम्या, विश्लेषण आणि महत्वाच्या गोष्टी… #कोकण आणि कोकणातील संस्कृती, सण, उत्सव, परंपरा, लोककला, खाद्यसंस्कृती आणि बरंच काही…
कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म
©️ 2024 Kokan Katta News, Media Network
Rg.No.MH-28-0047569
Ratnagiri, Dapoli
*वेगवान बातमी, अचूक आणि थेट भूमिका !*















