शृंगारतळी:बाजारपेठेत तुळसी विवाहासाठी चिंच आवळा दाखल

banner 468x60

    

गुहागर (प्रतिनिधी) गुहागर तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या शृंगारतळीत फळविक्रेते तुळसी विवाहासाठी सज्ज झाल्याचे दिसत आहेत.

banner 728x90

🔴कोकण कट्टा लाईव्ह व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन होण्याकरिता https://chat.whatsapp.com/Lfog3VaK6G32AY4ejSaFTi

कोकणात कार्तिकी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी तुळसी विवाहाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला जातो.

त्यामुळे या तुळसी विवाहासाठी येथील फळविक्रेते हसन तडवी हे दरवर्षीच आवळे, चिंच, ऊस, बोरे आदी फळे आपल्या स्टॉलवर ग्राहकांना उपलब्ध करून देतात. त्यामुळे यावर्षी सुद्धा हसन तडवी हे तुळसीविवाहासाठी सज्ज झाले आहेत.

शृंगारतळी बाजारपेठेत फळविक्रेते हसन तडवी हे फळविक्रीसाठी प्रसिद्ध आहेत. हसन तडवी हे ग्राहकांची गरज लक्षात घेऊन आणि विविध सणानुसार मालाची उपलब्धता लक्षात घेऊन विविध सणानुसार मालाची उपलब्धता वाजवी दरात करत असल्याने ग्राहकांनाही चांगली सेवा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *