जनसेवा युवा प्रतिष्ठान मार्फत किल्ले स्पर्धेत कु.रुद्र पालकर प्रथम

banner 468x60

गुहागर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांना छञपती शिवरायांच्या कार्याचे महत्त्व लक्षात यावे ह्यासाठी पालपेणे गावातील जनसेवा युवा प्रतिष्ठान तर्फे

“किल्ला शिवरायांचा – किल्ला बांधणी स्पर्धे”चे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी कुंभारवाडीतील पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रवेश देण्यात आला होता.

या स्पर्धेसाठी वाडीतील अनेक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करत भरभरून प्रतिसाद दिला. मुरुड जंजिरा, सिंधुदुर्ग, मल्हारगड आणि प्रतापगड

अशा वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती विद्यार्थ्यांनी बनविल्या. त्यासाठी त्या किल्ल्याबद्दल ऐतिहासिक माहिती घेऊन त्याला सजवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अतिशय सुंदर अशा प्रतिकृती पालपेणे येथील कुंभारवाडीत पहायला मिळाल्या. तसेच सदर किल्ल्याची माहिती विद्यार्थ्यांना स्वतःच्या भाषेत व्हिडिओ द्वारे प्रतिष्ठानला पाठवायची होती. अनेक विद्यार्थ्यांनी माहिती आत्मविश्वासपूर्वक आणि ऐतिहासिक संदर्भ देत व्हिडिओ द्वारे पाठविली. स्पर्धेसाठी निवेदन, किल्ल्याची तंतोतंत प्रतिकृती, वापरलेले साहित्य (पर्यावरण पुरक), सजावट व किल्ल्यावरील वस्तू असे निकष वापरून स्पर्धक ठरविण्यात आले. विजयी स्पर्धकांना चषक व रोख बक्षिस देऊन गौरविण्यात आले तर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या कु. रुद्र तेजपाल पालकरने प्रतापगडची प्रतिकृती बनवली आणि त्याची माहिती सांगितली. द्वितीय क्रमांक आलेल्या कु. मित महेंद्र मांडवकर आणि कु. माही महेंद्र मांडवकर ह्या चिमुकल्यांनी राजगड बनविला होता. तृतीय क्रमांकावर असलेल्या कु. चिन्मय दत्ताराम घाणेकर, कु. श्रावणी दत्ताराम घाणेकर आणि कु. सोहम राजेंद्र मांडवकर ह्यांनी सिंधुदुर्ग किल्ला बनविला होता. ह्या स्पर्धेत सहभागी घेतलेले विद्यार्थी कु. आयुष उदय नादगावकर, कु. आर्यन दिलीप पालकर यांनी मुरुडजंजिरा. कु. तन्मय गणपत टाणकर, कु. श्लोक गणपत टाणकर यांनी मल्हारगड. कु. आयुष शैलेश खैर, कु. राज उदय पालकर यांनी सिंधुदुर्ग. कु. पवन निलेश पालकर, कु. वेद दिपक पालकर, कु. आर्यन नरेश पालकर यांनी प्रतापगड. कु. श्रेया प्रभाकर कुळे, कु. प्रेम प्रभाकर कुळे, कु. आरुष वसंत मांडवकर यांनी लोहगड. कु. आर्यन घडवले याने पद्मदुर्ग. कु. सतीश प्रमोद मांडवकर याने मल्हारगड कु. अंश प्रशांत संसारे, कु. ओम प्रविण संसारे यांनी मुरुड जंजिरा अशा वेगवेगळ्या किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविल्या होत्या. या सर्व सहभागी विद्यार्थ्यांना जनसेवा युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रत्यक्ष भेटले व त्यांना प्रमाणपत्र दिले तसेच त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *