वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

banner 468x60

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये दि. २९\०६\२०२४ रोजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, विठ्ठलवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष,

मच्छिमार नेते, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री शंकर कोळथरकर यांचे वतीने सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

त्यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरजी कोळथरकर ,ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहिलकर, श्रीराम ग्रामस्थ मंडळाचे सरचिटणीस शैलेश रोहिलकर, खजिनदार रमेश रोहिलकर ,शाळेचे मुख्याध्यापक श्री. मनोज पाटील सर, श्रीमती धन्वंतरी मोरे मॅडम, श्रीमती सुषमा गायकवाड मॅडम ,श्रीमती अफसाना मुल्ला मॅडम उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री.मनोज पाटील सर यांनी सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे मॅडम यांनी केले . प्रास्ताविक श्री.मनोज पाटील सर यांनी केले .श्री शंकर कोळथरकर सर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे महत्त्व आणि वापर याविषयी मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहिलकर यांनी आधुनिक तंत्रज्ञान व त्यांचा शिक्षणात वापर याविषयी मार्गदर्शन केले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले . आभार प्रदर्शन सुषमा गायकवाड यांनी केले. कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला.

banner 728x90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *